देश विदेश

‘या’ 5 कारणांमुळे श्रीलंका देश झाला कंगाल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 July :- श्रीलंकेतील गत काही महिन्यांपासून सुरू असलेले सरकारविरोधी आंदोलन अधिकच उग्र झाले आहे. शनिवारी आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनाला घेराव घालून त्यावर नियंत्रण मिळवले. यामुळे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्यावर आपले सरकारी निवासस्थान सोडून पलायन करण्याची वेळ आली.

यापूर्वी गत महिन्यात संतप्त जमावाने राजपक्षे यांचे छोटे बंधू तथा माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या कोलंबो स्थित सरकारी निवासस्थानाला घेराव घातला होता. त्यानंतर महिंदा यांनी कुटुंबासह पळ काढून एका नौदल तळावर आश्रय घेतला होता. चला तर मग या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया श्रीलंकेला उपासमारीच्या वळणावर नेवून ठेवणाऱ्या राजपक्षे घराण्याचा इतिहास, तसेच श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचे सर्वात मोठी कारणे…

गत एप्रिल महिन्यात श्रीलंकन सरकारमध्ये राजपक्षे कुटुंबातील 5 सदस्य सहभागी होते. यात राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे व पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासह अर्थमंत्री बासिल राजपक्षे, सिंचन मंत्री चामल राजपक्षे व क्रीडा मंत्री नामल राजपक्षे यांचा समावेश आहे. यातील गोटबाया वगळता सर्वांनी राजीनामे दिलेत.

एकेकाळी श्रीलंकेच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पाच्या 70 टक्के भागावर राजपक्षे बंधूंचे थेट नियंत्रण होते. राजपक्षे कुटुंबावर 5.31 अब्ज डॉलर्स म्हणजे 42 हजार कोटी रुपया रुपयांच्या गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हे पैसे त्यांनी देशाबाहेर लपवल्याचा संशय आहे. यात महिंदा राजपक्षे यांचे निकटवर्तीय अजित निवार्ड कबराल यांनी महत्वाची भूमिका बजावली. कबराल हे सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेचे गव्हर्नर होते.

महिंदा राजपक्षे
76 वर्षीय महिंदा राजपक्षे समुहाचे प्रमुख व काही महिन्यांपूर्वीपर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी वाढत्या आंदोलनामुळे गत 10 मे रोजी राजीनामा दिला. त्यांनी 2004 मध्ये पंतप्रधानपद भूषवले. त्यानंतर 2005 ते 2015 पर्यंत सलग 10 वर्षे ते लंकेच्या राष्ट्रपतीपदी राहिले. या काळात त्यांनी आपले बंधू गोटबाया राजपक्षे यांना तमिळ आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश दिले होते.
महिंदा राजपक्षेंच्या नेतृत्वात श्रीलंका व चीनची जवळीक वाढळी. त्यांनी चीनकडून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्साठी तब्बल 7 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले.
विशेष बाब म्हणजे यातील बहुतांश प्रकल्प केवळ कागदावर होते. त्यांच्या नावे त्यांनी अमाप भ्रष्टाचार केला.
महिंदा हे राजपक्षे कुटुंबातील सर्वात ताकदवान सदस्य होते. त्यामुळे त्यांना ‘द चीफ’ म्हटले जाते. त्यांनी लंकेचे राष्ट्रपती व पंतप्रधान म्हणून काम केले आहे.

गोटबाया राजपक्षे
माजी लष्करी अधिकारी असणाऱ्या गोटबाया यांनी 2019 मध्ये लंकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवपदासह अनेक महत्वाची पदे सांभाळलीत.
2005-2015 या काळात मोठे बंधू महिंदा राजपक्षे यांच्या संरक्षण सचिवपदाच्या कार्यकाळात तामिळ फुटीरतावाद्यांचा म्हणजेच एलटीटीईचे आंदोलन निर्दयीपणे मोडून काढण्यात आले.
कर कपातीपासून ते शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घालण्यापर्यंतची गोटाबाया यांची धोरणे सध्याच्या संकटाचे कारण मानली जात आहेत.

बासिल राजपक्षे
71 वर्षीय बासिल राजपक्षे अर्थमंत्री होते. ते श्रीलंकेतील सरकारी कंत्राटात कथित कमिशन घेण्यासाठी कुप्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांना ‘मिस्टर 10 पर्सेंट’ म्हटले जाते.
बासिल राजपक्षे गत काही महिन्यांपर्यंत श्रीलंकेचे अर्थमंत्री होते. ते भ्रष्टाचारात आकंठ बुडाले होते. त्यामुळे लाचखोरीच्या बाबतीत त्यांना मिस्टर-10 पर्सेंट म्हटले जात होते.

चामल राजपक्षे
79 वर्षीय चामल महिंदा राजपक्षेचे मोठे बंधू आहेत. त्यांनी शिपिंग व एव्हिएशन मंत्रालयाचा कारभार पाहिला आहे. आतापर्यंत ते सिंचन मंत्रालयाचा पदभार सांभाळत होते.
चामल यांनी जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके यांचे अंगरक्षक म्हणूनही काम केले आहे.
चामल हे राजपक्षे बंधूंत सर्वात कमी वादग्रस्त राहिले. पण, लंकेला लुटण्यात त्यांनीही कोणती कसर ठेवली नाही.

नामल राजपक्षे
35 वर्षीय नामल हे महिंदा राजपक्षेंचे मोठे सुपुत्र आहेत. 2010 मध्ये अवघ्या 24 व्या वर्षी ते खासदार झाले. आतापर्यंत ते क्रीडा व युवक मंत्रालयाचा पदभार सांभाळत होते.
त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. पण नामल यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.