महाराष्ट्र

जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

मुंबई:- जालन्यात झालेल्या लाठीमार प्रकरणी गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंतरवाली सराटे येथील लाठीमारप्रकरणी गृह मंत्रालयाने तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तुषार दोषी यांच्या आदेशामुळेच हा लाठीमार करण्यात आला. आंदोलन शांततेत सुरू होतं. पण अचानक आदेश आला आणि लाठीमार करण्यात आला, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे.