ट्रम्प सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष
निवडणुक जिंकल्यानंतर ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला
20 Nov :- प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांनी निडवणुका जिंकल्यानंतर पहिल्यांदा पराभव न स्वीकारणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले आहे. बायडेन यांनी ट्रम्प यांना अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले – पराभूत होऊनही जिद्दीवर अडलेले ट्रम्प देशाच्या लोकशाहीला नुकसान पोहोचवत आहेत. याच काळात जॉर्जियामध्ये झालेल्या रिकाउंटमध्ये बायडेन यांनी विजय मिळवला आहे. एका रिपोर्टनुसार, बायडेन यांना आतापर्यंत 8 कोटी पॉपुलर वोट म्हणजेच जनतेचे मत मिळाले आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान बायडेन यांनी निवडणुक जिंकल्यानंतर ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. या दरम्यानही बायडेन यांनी चुकीच्या शब्दांचा वापर केला नाही, जे आतापर्यंत ट्रम्प त्यांच्या विरोधात वापरत आले आहेत. बायडेन म्हणाले – नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये अमेरिकेच्या नागरिकांनी आपला दृष्टीकोण स्पष्ट केला. ट्रम्प निवडणूक हारले आहेत. मात्र ज्या प्रकारे ते वागत आहेत, यावरुन स्पष्ट होते की, ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष सिद्ध होत आहे.
वाचा :- बीड- जावयाने सासुरवाडीत जाउन केली पत्नीची निर्घून हत्या
एक देश म्हणून अमेरिकेचा जगात चुकीचा संदेश जात आहे. बायडेन यांनी प्रश्न केला – आता राष्ट्राध्यक्ष काय करत आहे? ज्या प्रकारे गोष्टी समोर येत आहेत, त्यावरुन स्पष्ट होते की, ते जबाबदार दिसत नाहीत. प्रत्येक गोष्टीचे काही सिद्धांत असतात, मात्र ते जे कामे करत आहेत किंवा जे करण्याविषयी विचार करत आहेत, या गोष्टींना आपण कायदेशीररीत्या योग्य मानू शकतो का. एक लोकशाही देश म्हणून आपली जबाबदारी आहे की, आपण जगाला योग्य संदेश द्यावा. हे सांगा की, लोकशाही काय असते आणि कशाप्रकारे काम करते.
वाचा :- मोठी दुर्घटना! किल्ला पाहण्यासाठी गेलेली महिला कोसळली खोल दरीत
वाचा :- मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय