देश विदेश

चीन हादरले;नव्या व्हायरसचे थैमान सुरु

5 Aug :- कोरोना विषाणूचे उगमस्थान असणारा चीन देशातून कोरोनाचा पसरावं सुरु झाला आणि आता कोरोना विषाणूचा कहर जगभरात सुरु आहे.कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे जगातील अर्थव्यवस्थेचं पार कंबरडं मोडले आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये चीन देशात आणखी एका नव्या व्हायरसने थैमान घातले असल्याची बातमी समोर आल्याने आता जगभरात भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.चीनमध्ये कोरोनानंतर ब्युबोनिक प्लेग आणि आता एसएफटीएस व्हायरसने कहर केला आहे.चीनमध्ये एसएफटीएस व्हायरसची प्रकरणं दिसून आली आहे.

या संसर्गजन्य आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि 60 पेक्षा अधिक जण संक्रमित झाले आहेत. चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हा आजार माणसांमार्फत माणसांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्याबाबत लोकांना सावध करण्यात आलं आहे.पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांतात वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एसएफटीएस व्हायरसमुळे 37 पेक्षा अधिक लोक संक्रमित झालेत आणि आता अन्हुई प्रांतात 23 जणांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळते आहे, अशी माहिती पीटीआयने सरकारी ग्लोबल टाइम्सच्या वृत्ताचा हवाला देत दिली आहे.जियांग्सूची राजधानी नानजियांगमध्ये या व्हायरसमुळे संक्रमित असलेल्या एका महिलेमध्ये सुरुवातीला खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसून आली. तिच्या शरीरात ल्युकोसाइट आणि प्लेटलेट कमी झाल्याचं डॉक्टरांना समजलं.

एक महिन्याच्या उपचारानंतर या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रिपोर्टनुसार, अन्हुई आणि पूर्व चीनमध्ये झेनियांग प्रांतात कमीत कमी सात लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.एसएफटीएस हा व्हायरस नवा नाही. चीनमध्ये 2011 साली या व्हायरसची माहिती झाली होती. प्राण्यांच्या शरीरावर चिकटणाऱ्या कीटकांमुळे हा आजार माणसांमध्ये पसरतो आणि माणसांमार्फत माणसांमध्येही त्याचा प्रसार होऊ शकतो.