देश विदेश

पाकिस्तानमध्ये झाला मोठा बॉम्बस्पोट!

पेशावरमधल्या मदरशात बॉम्बस्फोट झाला

27 Oct :- पाकिस्तानमधील पेशावरमधल्या मदरशात बॉम्बस्फोट झाला आहे. दिर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटात पाच मुलांचा मृत्यू झाला असून 70 लोक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांकडून मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मदरशात झालेला बॉम्बस्फोट टाईम बॉम्बमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांतील हा अत्यंत मोठा स्फोट मानला जात आहे. या बॉम्बस्फोटामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही