ब्रिटनच्या महाराणींची प्रकृती गंभीर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 Sept :- ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती नाजूक आहे. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवले आहे. महाराणीच्या प्रकृतीविषयी बकिंघम पॅलेसने एक निवेदनही जारी केले आहे. वृत्तानुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक नजर ठेऊन आहे.
‘डॉक्टर महामहीम यांच्या आरोग्यावर चिंताग्रस्त आहेत.’ दुसरीकडे, ब्रिटीश पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही या बातमीवर चिंता व्यक्त केली आहे. त्या एका ट्विटद्वारे म्हणाल्या -‘बकिंघम पॅलेसच्या वृत्तामुळे अवघा देश चिंताग्रस्त झाला आहे. माझ्यासह अवघ्या देशाच्या भावना सध्या महाराणी व त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.’