देश विदेश

ब्राझीलचे अध्यक्ष कोरोनाच्या विळख्यात

12 July जिकडे पाहावं तिकडे फक्त कोरोनाचाच कहर सुरु आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी प्रशासन आहोरात्र मेहनत घेत आहे.मात्र कोरोनाच वाढतं थैमान आटोक्यात आणणे शक्य होत नाहीए.ब्राझीलमध्ये जवळपास 16 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित आहेत. यापैकी जवळपास 66 हजार नागरिकांचा जीव गेला आहे. अशा भयाण परिस्थितीमध्ये आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

“कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असून मला कोणताही त्रास होत नसून मी बरा आहे,” असं बोल्सोनारो यांनी सांगितलं. ब्राझीलमधील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये ब्राझील सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.