भारत

पंतप्रधान मोदींनी केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फुट उंच पुतळ्याचे अनावरण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

​​​8 Sept :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटसमोरील सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचे उद्घाटन केले आहे. रात्री ठीक 7 वाजता ते कर्तव्य मार्गावर पोहोचले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले. हा कार्यक्रम 90 मिनिटे चालणार आहे. 19 महिन्यांच्या अखंड कामगिरीनंतर सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू तयार झाला आहे. उद्घाटनाच्या आदल्या दिवसांपर्यंत सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूवर काम सुरूच होते. एका पर्यवेक्षकाने सांगितले की काम लवकर पूर्ण करायचे होते. त्यामुळे मजूर 24 तास काम करीत होते. 9 सप्टेंबरपासून लोकांना येथे प्रवेश करता येणार आहे.

अपडेट्स :- 7.25 वाजता पीएम मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू ज्यांच्या परिश्रमाने उभा राहीला अशा कामगारांशी संवाद साधला.
अपडेट्स 7 वाजता :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन केले.

सेंट्रल व्हिस्टाच्या उद्घाटनामुळे गुरुवारी दुपारी 3 वाजेपासून दिल्ली उच्च न्यायालय तसेच पतियाळा हाऊस न्यायालय बंद राहणार आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) ताब्यात घेतली. उद्घाटनापूर्वी बाहेरील व्यक्तीला या परिसरात प्रवेश दिला जात नाहीये. केंद्रीय दलाशिवाय खासगी सुरक्षा रक्षकही लक्ष ठेवून आहेत. येथे फोटो काढण्यासही मनाई आहे. कडेकोट बंदोबस्तामुळे पर्यटक बॅरिकेड्सजवळ उभे राहून इंडिया गेट पाहण्याचा प्रयत्न करत राहिले.

खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका विक्रेत्याने सांगितले की, तीन वर्षे अत्यंत कठीण काळात गेली आहेत. परिसरात सर्वत्र काम सुरू होते. आता ते खूप सुंदर झाले आहे. आशा आहे की आणखी लोक येथे येतील आणि आमचा व्यवसाय चांगला चालेल. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, 90 मिनिटे चालेल. त्यासाठी आजूबाजूचे रस्ते सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जाणून घ्या पंतप्रधान मोदींचा मिनिटा-मिनिटाचा कार्यक्रम…

7:00 PM – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण 7:10 PM – इंडिया गेटला पोहोचतील पीएम 7:25 PM – कामगारांशी संवाद 7:30 PM – कर्तव्यपथाचे उद्घाटन 7:40 PM – स्टेजवर पोहोचतील पीएम 8:02 PM – पंतप्रधान मोदींचे भाषण

सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत 3.2 किमी पसरलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याची रचना डॉ. बिमल पटेल यांनी केली आहे. लाल ग्रॅनाइटपासून बनवलेल्या 15.5 किमीच्या पायवाटेपासून ते 16 पूल आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सपर्यंतची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सुमारे 20 महिन्यांनंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल. उद्घाटनाच्या आदल्या दिवसापर्यंत सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूवर काम सुरूच होते. एका पर्यवेक्षकाने सांगितले की बुधवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण करायचे आहे, त्यामुळे मजूर 24 तास कार्यरत आहेत. ९ सप्टेंबरपासून लोकांना येथे फिरता येणार आहे.