बीडक्राईम

धक्कादायक घटना: करंट लागून आई व दोन मुलांसह अन्य एकाचा मृत्यू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि.०३ सप्टेंबर :- गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे घरा जवळ तुटून पडलेल्या विद्युत तारेचा करंट लागून आई व दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ललिता श्रीकांत राठोड, मुलं प्रशांत श्रीकांत राठोड, अभिजित श्रीकांत राठोड असे मयत आई व मुलांची नावे आहेत. तसेच दुसरी घटना बीड तालुक्यातील चौसाळा येथे गिझरचा करंट लागून ३५ वर्षीय तरुण तारेख अजीज कुरेशी यांचा ही मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीच्या वेळी काळाने झडप घातल्याने या दोन घटनेत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.