बीड

पत्रकार परिषदेपूर्वी बजरंग सोनवणे कडून राजेश्वर चव्हाण यांचा सत्कार

5 March :- राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी बजरंग सोनवणे यांनी राजेश्वर चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर बजरंग सोनवणे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे व त्यामुळे ते आज साडेबारा वाजता बीड येथे पत्रकार परिषद आयोजित करणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आज पहाटे राजेश्वर चव्हाण यांनी बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. इतकेच नव्हे तर बजरंग बाप्पांच्या आईचे देखील राजेश्वर चव्हाण यांनी आशीर्वाद घेतले.