बीड

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!

2 Sept :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आज बीड जिल्ह्यामध्ये कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या उच्चांकी पोहचली आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यातून तब्बल 3557 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.आजपर्यंत बीड जिल्ह्यातील एकूण 4705 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 129 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर रुग्णालयात दाखल आसलेल्या ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 1019 आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 7.7% आहे.तर रिकव्हरी रेट 75.60 % आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!

हे वाचा :- इम्तियाज जलील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!