देश विदेश

रशियन सैनिक पळाले…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Feb :- रशियाचा युक्रेनवर हल्ला सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनने दावा केला आहे की, या लढाईत आतापर्यंत सुमारे 4,300 रशियन सैनिक मारले गेले आहेत. तसेच 146 रणगाडे, 27 विमाने आणि 26 हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आले आहेत.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी संध्याकाळी दावा केला की, त्यांच्या सैन्याने खार्किव शहर पुन्हा ताब्यात घेतले आहे आणि रशियन सैन्याने पळ काढला आहे. या शहराचे व्हिडिओ काही वेळात प्रसिद्ध होऊ शकतात. दुसरीकडे पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनमध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे, त्यामुळे या देशाला तातडीने मदत करण्यात यावी, असे म्हटले आहे.