बीड

लंडनवरून आलेला कोरोना जिल्ह्याच्या वेशीवर?

एनआयव्हीच्या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष!

25 Dece :- मधून गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात आलेल्या सर्व प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण आरोग्य विभागाने हाती घेतले असतानाच लंडनहून औरंगाबाद येथे आलेली एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला तातडीने विलगीकरणात ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. महिलेचे स्वॅब नमुने पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आले असून या महिलेला ब्रिटनमधील नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे स्पष्ट होईपर्यंत सर्वांचेच श्वास रोखले गेले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांचा तपशील सर्व राज्यांना आणि संबंधित स्थानिक यंत्रणांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही असा तपशील आला असून पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. त्यानुसार या सर्वच प्रवाशांचे राज्यात सर्वेक्षण सुरू असून लंडनहून औरंगाबाद येथे आलेल्या महिलेला करोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनहून परतलेल्या या ५७ वर्षीय महिलेची करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर या महिलेला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या महिलेचे स्वॅब नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत ( राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या तपासणीचा अहवाल आल्यानंतर सदर महिलेला झालेली करोनाची लागण कोणत्या स्वरूपाची आहे हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, २५ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४४ व्यक्ती औरंगाबाद शहरात विदेशातून आल्या आहेत. त्या सर्वांचीच आता करोना चाचणी केली जाणार आहे. ४४ पैकी १३ जणांचा ठावठिकाणा लागत नसून त्यांच्या शोधासाठी पोलीसांची मदत घेतली जाणार आहे, असे सांगण्यात आले.