बीड

प्रितमताई म्हणाल्या, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे निर्णय घेत आहे

प्रितमताई मुंडे शेतकरी संवाद कार्यक्रमात संबोधित करत होत्या

25 Dece :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांना पूर्ण करणारे निर्णय घेत आहे.नवा कृषी कायदा देखील शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारा असल्याचे प्रतिपादन खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी व्यक्त केले आहे. परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. यावेळी मंचावर भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, किसान मोर्चाचे उत्तमराव माने,अश्रूबा काळे,बाबासाहेब काळे,सुधाकर पौळ,सुरेश माने यांच्यासह भाजप कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पूढे बोलताना खा.मुंडे म्हणाल्या की ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत केली. देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आज प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा अठरा हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग केला,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील मदत करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असल्याचे यावेळी प्रितम मुंडे यांनी सांगितले.

तसेच देशातील गोरगरीबांचे प्रश्न सोडवून त्यांना आवश्यक मदत आणि मजुरांना न्याय देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत असल्याचे सांगताना कृषी कायद्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले,हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे.या कायद्याबाबत काही लोक अपप्रचार आणि संभ्रम पसरवत असले तरी देशातील शेतकऱ्यांनी या कायद्याचे समर्थन आणि स्वागत करणे अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.