महाराष्ट्र

नव्या कोरोनाला थोपवण्यासाठी ठाकरे सरकारने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

तरच प्रवाशांना घरी सोडण्यात येणार

25 Dece :- करोना संसर्ग आटोक्‍यात येत असताना आता ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणारी विमानसेवा देखील केंद्र सरकारने रद्द केली आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ह्या खास गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या देशांमध्ये लक्षणे नसल्याने प्रवाशांची आरटीपीसीआर RTPCR टेस्ट केली जात नाही. अशा प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.या क्वॉरंटाईनसाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहे. अशा प्रवाशांची RTPCR चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मुख्य सचिवांनी दिली आहे.करोना अहवाल निगेटिव्ह आला तर प्रवाशांना घरी सोडण्यात येणार आहे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल आणि रुग्णाला लक्षणे नसतील तर त्याच हॉटेल किंवा क्वॉरंटाईन सेंटरमध्ये त्यांना पुढील 14 दिवस ठेवले जाणार आहे.

दरम्यान, जगभरातील देश करोना विषाणूशी लढत असताना आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे.