महाराष्ट्र

राज्यात 5 हजार 111 रुग्णांनी केली कोरोनावर मात

गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली

9 Dece :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सलग 8 दिवसांपासून ही संख्या वाढलेली आहे. बुधवारी 9 डिसेंबर 5 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 17 लाख 42 हजार 191 एवढी झालीय. तर 4 हजार 981 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 18 लाख 64 हजार 348 एवढी झाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दिवसभरात 75 जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण संख्या कमी झालेली असताना मृत्यूचा आलेख निच्चांकी पातळीवर आणण्याचं आव्हान अजुनही कायम आहे. त्यासाठी काय करता येईल यावर आता आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे. यूकेमध्ये कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही कोरोना लसउत्पादक कंपन्यांनी आपल्या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज केले होते. मात्र भारतात कोरोना लशीला आपात्कालीन वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण या अर्जावर सध्या विचार केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतात हैदराबादमधील भारत बायोटेकनं कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटनेकोव्हिशिल्ड या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यावी यासाठी अर्ज केला होता. भारतीय औषध नियामक मंडळाकडे म्हणजे DCGI कडे ही मागणी करण्यात आली आहे.