महाराष्ट्र

‘या’ तारखेला मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Jan :- राज्यभरातील वातावरणात सध्या गारवा जाणवत आहे. मात्र असे असले तरी अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसात म्हणजेच आजपासून 10 जानेवारीपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 जानेवारी ते 10 जानेवारी या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

यासोबतच विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 7 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.