राजकारण

दिल्लीतील आंदोलन देशभर पसरले पाहिजे

स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या आधारे शेतकर्‍यांना लाभ द्यावा

8 Dece :- दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू असलेल्या या आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णांनी राळेगणमधील पद्मावती परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवसीय उपोषणाला बसले आहेत. केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावे अशा मागणीही अण्णांनी केली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अण्णा म्हणाले की, हे आंदोलन संपूर्ण देशात पसरले पाहिजे, जेणेकरून नवीन कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडले जाऊ शकते. अण्णा हजारे म्हणाले की, केंद्र सरकारने यापूर्वीही ही दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केला.

या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले नाही, तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये करेल, असा इशाराही अण्णांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे. अण्णा हजारे म्हणाले की, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार लाभ दिला पाहिजे. पण सरकारने आतापर्यंत केवळ आश्वासन दिले आहे. या मागण्या पूर्ण केल्या नाहीत असा आरोपही अण्णा हजारेंनी केला.