बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरणीला!

आज 31 रुग्ण पॉझिटिव्ह

8 Dece ;- बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर चांगलाच आटोक्यात आला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख घसरणीला जातो आहे. कोरोना विषाणूचा पसरावं आटोक्यात येत असला तरी ठिकठिकाणी वाढती गर्दी चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे. नागरिक तोंडावर मास्क न लावता सोशल डिस्टन्स न ठेवता सर्रासपणे सर्वत्र वावरताना दिसत आहेत.

कोरोना आटोक्यात येत असला तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेलं नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात आज (मंगळवारी) 31 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.