बीड

किल्लेधारुर तालुक्यात 1 कोरोना पॉझिटीव्ह

किल्लेधारूर दि.५(प्रतिनिधी) तालुक्यातील आंबेवडगाव येथील एका संशयिताचे स्वॅब काल तपासणीकरिता पाठवण्यात आले होते. सदरील स्वॅब पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे.

मुंबईहून परतलेल्या एका संशयिताचे स्वॅब काल दि.४ रोजी केज उपजिल्हा रुग्णालयातून पाठवण्यात आले होते. आज जिल्ह्यातून ३० स्वॅब पाठविण्यात आली होती. यातील आंबेवडगाव येथील ६५ वर्षीय इसमाचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३० पैकी २९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर किल्लेधारुर तालुक्यातील आंबेवडगावच्या इसमाचे स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे खळबळ माजली असुन परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु केली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.