News

मोजक्याच लोकांना मोफत कोरोना लस; मोदी सरकारच्या विनामूल्य लशीकरण यादीत कोण आहे पाहा

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : काही देशांनी आपल्या देशात मोफत कोरोना लस (corona vaccine) देण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारही मोफत कोरोना (corona vaccine in india) लस देणार आहे. मात्र सर्वांनाच मोफत कोरोना लस पुरवणार नाही, हेदेखील सरकारनं स्पष्ट केलं आहे. सरकारमार्फत सर्वांचं लशीकरण (covid 19 vaccination) मोफत होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इतर देशांच्या कोरोना लशीच्या तुलनेत भारतात कोरोनाची लस स्वस्त असणार आहे, असं आरोग्य मंत्रायलानं (health ministry) सांगितलं आहे. फक्त प्राथमिक गटाच्याच लशीकरणाचा खर्च सरकार उचलणार आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे किंवा कोव्हिड रुग्ण म्हणून ज्याची नोंद आहे, त्यांचाच मोफत लशीकरण होणार आहे. मोफत कोरोना लस नसली तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना लस सर्वात स्वस्त असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) देखील याबाबत बैठक घेतली. काही आठवड्यात कोरोना लस उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. तज्ज्ञांकडून मंजुरी मिळताच कोरोना लशीकरण कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. कोरोना लशीची किंमत किती असावी हे ठरवण्यासाठी राज्यांचीही मदत घेतली जाणार आहे. राज्यांची चर्चा करून, त्यांचा सल्ला घेऊनच कोरोना लशीची किंमत ठरवली जाणार आहे. लशीतरणार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल.

भारतात सध्या सीरम इन्स्टिट्युट, भारत बायोटेक आणि झायडक कॅडिलासह आणखी तीन अशा एकूण 6 कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. पुढील वर्षात मार्चपर्यंत एक तरी लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील नुकतीस तीन लशींची पाहणीही केली आहे. शिवाय मंत्रालयानं आणखी 8 लशींचा उल्लेख केला आहे, ज्यातील बहुतेक लशी तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये पोहोचल्या नाहीत.एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, “भारतात काही लशी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या वर्षाच्या अखेरला किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळण्याची आशा आहे.”लस सुरक्षित आहे याचा पुरेसा डेटा उपलब्ध आहे. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याच कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. 70,000-80,000 लोकांना लस देण्यात आली. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले नाही”, असंही त्यांनी सांगितलं.

सुरुवातीच्या टप्प्यात भारतात 30 कोटी लोकांचं लशीकरण होणार आहे. जुलै 2020 पर्यंत 50 कोटी डोस बनवण्याची आणि 25 कोटी लोकांचं लशीकरण करण्याची योजना आहे. भारतात निवडणुकीत जसे मतदान केंद्रं असतात तशी कोरोना लशीकरणासाठी केंद्र तयार करण्याचा विचार सरकारचा आहे. विभागनिहाय तयारी केली जाईल. सरकारी किंवा खासगी डॉक्टरांना या मोहीमेची विशेष जबाबदारी सोपवली जाईल. मतदान केंद्रांप्रमाणे टीमही तयार केल्या जातील. लोकांनाही यात सामावून घेतलं जाईल, त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं जाईल.