NewsPopular NewsRecent Newsभारतमहाराष्ट्रराजकारण

नारायण राणे यांना विजेचा “शॉक”

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

ऑगस्ट २८ | सिंधुदुर्ग : वादग्रस्त विधानामुळे सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच चर्चेत आहेत. राणे जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यामातून महाराष्ट्र पिंजून काढतायेत. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे राणेंना अटक करण्यात आली. त्यानंतर काही तासातच त्यांची सुटकाही करण्यात आली. त्यानंतर राणेंनी 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जन-आशिर्वाद यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा आता रत्नागिरीतून राणेंच्या होमपिच अर्थात सिंधुदुर्गात पोहचली. राणे केंद्रीय मंत्री झाल्याने त्यांचं जोरदार स्वागत केलं गेलं.

याच प्रमाणे कणकवलीतही स्वागत केलं गेलं. मात्र या दरम्यान त्यांना चांगलाच ‘जोर का झटका’ बसला म्हणजेच त्यांना विजेचा झटका लागला. सुदैवाने यात राणेंना काहीही झालं नाही.जण आशीर्वाद यात्रेदरम्यान शुक्रवारी कणकवलीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारायण राणे आले होते. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते जात होते. त्यावेळी रेलिंगला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचा सौम्य करंट राणेंना बसला.

झटका बसताच राणेंनी आपला हात जोरात झटकला. यावेळेस त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणेही सोबत उपस्थित होते. हा प्रकार घडल्यानंतर राणेंनी सर्व बिघाड दुरुस्त करण्याचे आदेश दिले.