राजकारण

वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ उद्या मनसेचं राज्यव्यापी आंदोलन

संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार

25 Nov :- वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी उद्या संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. उद्या संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. वाढीव वीज बिलांच्या प्रश्‍नांवरील आंदोलनात सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षानंतर आता मनसेने उडी घेतलेली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

उद्या राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी या मोर्चाचं नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झालेल्या कालावधीमध्ये विजेचा वापर जास्त झाल्याचे कारण देत महावितरण’च्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठविण्यात आलेली आहेत.

वाचा :-  पंकजाताईंनी केला धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

अवाच्या सव्वा वीज बील असल्यामुळे याच्या विरोधामध्ये लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. राज्य सरकारने ही वीज बिलं दुरुस्त करून देण्याची देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र पुन्हा राज्य सरकारने घूमजाव केल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या (26 नोव्हेंबर) संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकाच वेळी वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आणि शासकीय धोरणांच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केलेला आहे.

वाचा :-  रुग्णसंख्येत मोठी वाढ! राज्याची वाटचाल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे?

मनसेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होऊन राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क , सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन हे मोर्चा पार पाडण्यात येणार आहेत. नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण न करण्यात राज्य शासन हतबल झालेल आहे.

वाचा :-  निर्बंध वाढणार! केंद्र सरकारच्या कोरोना बाबत नव्या गाइडलाइन्स

अनेक वीज ग्राहकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सरकार विरोधात, महावितरण विरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ निघणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चे वेळी राज ठाकरे सरकारवर आणि ऊर्जा मंत्र्यांवर कसे बरसणार याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.

वाचा :-  लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्त

वाचा :- त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’- शरद पवार