क्रीडा

कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करण्याची क्षमता आहे- शास्त्री

रवी शास्त्रीनीं व्यक्त केला विश्वास!

25 Nov :- टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र एकदिवसीय आणि टी 20 पेक्षा कसोटी मालिकेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाने अखेरच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलिाचा कसोटी मालिकेत 2-0 च्या फरकाने पराभव केला होता. यावेळेसही टीम इंडिया कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. आमच्याकडे फॅब्युस फाईव्ह आहेत. म्हणजेच टॉप 5 खेळाडू आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

टीम इंडियाचे 5 खेळाडू ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत पराभव करतील, असा विश्वास भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी ‘मी टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीबद्दल आश्वस्त आहे. आमच्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी असे एकूण फॅब्युलस फाईव्ह गोलंदाज आहेत. उमेश अनुभवी आहे. नवदीप सैनी तरूण आहे. तसेच त्याच्याकडे वेगाने गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. बुमराह सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आणि उत्सुक आहे. मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाचा पाडाव करण्साठी तयार आहे. या सर्व गोलंदाजांमध्ये कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करण्याची क्षमता आहे, आणि ते नक्कीच करतील’, असा विश्वासही शास्त्रींनी व्यक्त केला.

वाचा :-  पंकजाताईंनी केला धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Sport Starच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या मालिकेतील ताणतणावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते उत्तर देताना म्हणाले की ‘दबाव कुठे आहे? आम्ही येथे आपला नैसर्गिक खेळ खेळायला आलो आहोत. मी सर्व खेळाडूंना परिस्थितीचं भान ठेवून आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा आदर करण्यास सांगितले आहे. तसेच निर्भयपणे अर्थात बिंधास्त खेळण्याचा सल्ला दिला आहे’.

वाचा :-  रुग्णसंख्येत मोठी वाढ! राज्याची वाटचाल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे?

कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा पहिली कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. हा सामना अॅडिलेडमध्ये खेळला जाणार आहे. पिंक अर्थात गुलाबी चेंडूनी हा सामना खेळण्यात येणार आहे. ‘आमच्या खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूने खेळण्याचा फारसा अनुभव नाही. मात्र खेळाडूंनी मैदानात जाऊन गुलाबी चेंडू खेळावं आणि आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे’, असं शास्त्री म्हणाले.

वाचा :-  निर्बंध वाढणार! केंद्र सरकारच्या कोरोना बाबत नव्या गाइडलाइन्स

वाचा :-  लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्त

वाचा :- त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’- शरद पवार