महाराष्ट्र

रुग्णसंख्येत मोठी वाढ! राज्याची वाटचाल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे?

65 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले

25 Nov :- राज्यात कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण आटोक्यात येत असतानाच दिवाळीनंतर पुन्हा रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. नागरिकांचं मास्क न वापरता सर्वत्र फिरणे, ठिकठिकाणी वाढती गर्दी, सोशल डिस्टन्स उडत असलेला फज्जा, आणि रोज राज्यात उंचावत असलेला रुग्णवाढीचा आलेख यावरून नक्कीच राज्याची वाटचाल कोरोनाच्या दुसऱ्या वाटेकडे होऊ लागली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अनेक तज्ञांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण राज्यात आज कोरोनाचे 6 हजार 500 आढळले आहेत. तसंच 65 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. आज 4 हजार 800 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यासह देशात थैमान मांडलं होतं. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोनाला आटोक्यात आणण्यात शासन-प्रशासनाला यश मिळाले.

वाचा :-  निर्बंध वाढणार! केंद्र सरकारच्या कोरोना बाबत नव्या गाइडलाइन्स

राज्यातील कोरोना रुग्णांमध्येही मोठी घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही संख्या वाढीस लागल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काळात कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे.

वाचा :- पंकजाताईंनी केला धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

वाचा :-  उद्धव ठाकरेंना प्रशासन चालवता येत नाही. ते केवळ पक्ष चालवू शकतात

वाचा :-  लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्त