राजकारणमहाराष्ट्र

अजित पवारांचे उद्धव ठाकरेंबद्दल मोठे विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि. 25 ऑगष्ट : माविआ सरकारचे नेतृत्व जर उद्धव ठाकरे करणार असतील, तर हे सरकार व्यवस्थित चालेल असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की नाही! हे मी साहेबांना विचारेन” असे विधान विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. त्यांच्या या एका विधानामुळे हा मुद्दा पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यानंतर ते म्हणाले की, “पवार साहेब असे म्हटले का? मी आता साहेबांना विचारेन की साहेब तुम्ही असे काही म्हटले होते का!”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले की, माझ्यात अनेक गुण आहेत. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आम्ही (काॅंग्रेस-राकॉपा) शिवसेनेला सांगितले की, पाच वर्षांसाठी तुम्ही तुमचा मुख्यमंत्री करा. शिवसेना आपल्या पक्षातून कोणाला मुख्यमंत्री बनवते? हे आम्ही कसे ठरवणार.

या पुढे अजित पवार म्हणाले की, “शरद पवारांनी जरी काही सांगितले, तर त्या पक्षांनी त्यांचा निर्णय घ्यावा. येथे बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत आणि ते साक्षीदार आहेत की यापूर्वीच्या सरकारमध्ये काँग्रेसने त्यांचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेत आपली तीन नावे राष्ट्रवादीकडे पाठवली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचा नेता कोण असावा, हे आम्ही (राकॉपा) कसे ठरवायचे? आणि त्यांना त्यांचे स्वतःचा निर्णय घेण्यास सांगण्यात आले.