राजकारण

जयसिंगरावांनी पक्ष सोडताच पंकजाताईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर पंकजाताईंनी केले अभिवादन

17 Nov :- मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकला. गायकवाड यांची समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न झाला, तरीही ते भाजप सोडून गेले. ‘पक्ष आणखी ताकदीने निवडणूक लढेल’, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. पंकजा मुंडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतिस्थळावर अभिवादन केले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते.परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.

वाचा :- पंकजाताईंनी केले भाजप शिवसेना युतीवर भाष्य

जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.

वाचा :- अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!

वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

वाचा :- तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!