राजकारण

केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणू पाहत आहे

खासदार सुप्रिया सुळे यांनी केला थेट आरोप

3 Nov :- कांजूरमार्ग येथील मिठागरांच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यास विरोध करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. ‘राज्यांचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप सातत्यानं सुरू असून केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणू पाहत आहे,’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मुंबई मेट्रोच्या नव्या प्रकल्पासाठी आरे कॉलनी ऐवजी कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं नुकताच घेतला होता. मात्र, केंद्र सरकारच्या उद्योग व व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) त्यास आक्षेप घेतला आहे ही जागा केंद्राच्या मालकीची असल्याचं सांगत कारशेडचं काम थांबवण्याच्या सूचना केंद्रानं केल्या आहेत. त्यावरून राजकारण रंगलं आहे.

वाचा :- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रकल्पातील या अडथळ्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर, सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर तोफा डागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्राच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘केंद्राची भूमिका धक्कादायक आहे. कुठल्याही कायद्यानुसार राज्यातील जमिनीवर राज्याचाच पहिला अधिकार असतो. पण केंद्रानं आता नवीनच काहीतरी काढलंय. राज्यांचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम केंद्र सरकार सातत्यानं करतंय. त्यांच्या कृतीतून ते दिसतंय. हे सगळं दुर्दैवी आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा :- अमिताभ बच्चन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल!

‘केंद्र सरकार सरळसरळ महाराष्ट्राच्या विकासात हस्तक्षेप करतंय. जमीन महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या जनतेसाठी तिचा वापर होतोय. तिथं कुठलंही म्युझियम होत नाही किंवा व्यक्तिगत काम होत नाही. असं असताना केंद्र सरकारनं अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, महाराष्ट्राशी दुजाभाव आहे. केंद्र सरकार केवळ संघराज्य पद्धतीबद्दल केवळ भाषणं देते. पण केंद्राला हळूहळू आणीबाणी आणायची आहे असं दिसत असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

वाचा :- आमिर खानच्या मुलीचे झाले लैगिंक अत्याचार

वाचा :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

वाचा :- शिवसेनेचा दावा! 50 हजार गरीब कुटुंबांना मिळणार पक्के घर