क्रीडा

पुढील IPL कधी, कुठे होणार? गांगुलीने दिली ‘ही’ माहिती

गांगुलीने व्यक्त केला विश्वास

8 Nov :- कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल युएईमध्ये खेळवली गेली. यानंतर आता पुढच्या वर्षीची आयपीएल कुठे होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. बीसीसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या वर्षीची आयपीएल भारतातच एप्रिल-मे महिन्यात होईल, असं गांगुली म्हणाला आहे. याचसोबत भारतात इंग्लंडविरुद्धची सीरिज फेब्रुवारी महिन्यात होईल, असं गांगुलीने सांगितलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पुढच्या वर्षातली आयपीएल भारतात खेळवण्यासाठी बीसीसीआय तयार असेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला आहे. ‘युएई फक्त आयपीएल पुरतच मर्यादित होतं. इंग्लंड भारत दौऱ्यावर येईल, तसंच रणजी ट्रॉफीलाही भारतामध्ये सुरुवात होईल. यासाठी आम्ही बायो बबल तयार करू,’ असं वक्तव्य गांगुलीने केलं.

वाचा :- मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात

‘नोव्हेंबर महिन्यापासून गोव्यात आयसीएल सुरू होत आहे. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही. आयपीएलमुळे बरीच मदत झाली,’ असं गांगुली म्हणाला आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. ‘सध्या महिलांच्या आयपीएलमध्ये फक्त 3 टीम आहेत. पण पुढच्या 2 वर्षांमध्ये 7 ते 8 टीम असतील. आयपीएलसारखंच महिलांचंही फ्रॅन्चायजी क्रिकेट सुरू होईल, ‘असा विश्वास गांगुलीला आहे.

वाचा :- परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

वाचा :- पंकजाताईंना राष्ट्रवादीने दिला जोरदार दणका