मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात
ठोसा मारुन पाडले बायकोचे दात
8 Nov :- भांड्याला भांड लागल्याशिवाय संसार होत नाही असं म्हणतात. नवरा आणि बायकोचं नातं हे प्रेमापेक्षा अनेकदा वादामध्ये असतं. मात्र छोटा-मोठा वाद विकोपाला गेल्यास घडतो गुन्हा.औंध गावात अशीच एक घटना घडली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पतीने मटण आणून बायकोला बनविण्यास दिले. हातात दुसरे काम असल्याने मटण दीड तासानंतर बनवून देते, असे पत्नीने त्याला सांगितले. मटन बनवण्यासाठी एवढा वेळ का लागणार असे त्याने विचारले. मटन बनवण्यास उशील लागेल असे बायकोने सांगितल्याचा राग आल्यामुळे पतीने पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात जोरात तिच्या तोंडावर ठोसा मारुन तिचे दात पाडले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरू करा- मुख्यमंत्री
याप्रकरणी प्रभाकरन् नाडार (वय 45) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता नाडार (वय 40) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता आणि प्रभाकरन् पती-पत्नी असून औंध गावात राहातात.
वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली
दोन दिवसांपूर्वी प्रभाकरन दारु पिऊन घरी मटण घेऊन आला होता. त्याने कविताला मटण बनवून देण्यास सांगितले. मात्र, हातात काम असल्याने दीड तासानंतर मटण बनवून देते असे तिने प्रभाकरनला सांगितले. त्याचा राग आल्यामुळे त्याने कविताला शिवीगाळ करत तिच्या तोंडावर ठोसा मारला. त्यामुळे कविताचे दात पडून दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाचा :- पंकजाताईंना राष्ट्रवादीने दिला जोरदार दणका
वाचा :- गंभीर इशारा! पुढील महामारीला तोंड देण्यासाठी रहा सज्ज- WHO