200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
आणखी कार्यकर्ते येतील- खडसे
3 Nov :- एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या मतदार संघातच खडसेंनी फूट पाडली आहे. जामनेरयेथील २०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यापासून जळगावातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदधिकारी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आज तब्बल २०० हून अधिक कार्यकर्यांनी खडसेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा राज्यातील भाजप नेतृत्वासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे. यावरूनच, जळगावात अद्यापही खडसेंचं वर्चस्व कायम असल्याचं दिसून येत आहे.
वाचा :- अभिनेता विजय राज यास तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक
एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी खडसेंची कन्या रोहिणी खडसे या देखील उपस्थित होत्या. जामनेर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
वाचा :- अमिताभ बच्चन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल!
हे कार्यकर्ते यापूर्वी भाजपचे नि:स्वार्थपणे काम करत होते. त्यातील काही कार्यकर्ते हे भाजपचे पदाधिकारी होते, तर काही कार्यकर्ते हे आजही भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करत होते. परंतु, अलीकडे ते पक्ष नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.
वाचा :- आमिर खानच्या मुलीचे झाले लैगिंक अत्याचार
यापुढच्या काळात असे अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिक बळकटी येईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
वाचा :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
वाचा :- शिवसेनेचा दावा! 50 हजार गरीब कुटुंबांना मिळणार पक्के घर