बीड

बीडमधून 69 रुग्ण झाली कोरोनामुक्त!

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!

31 Oct :- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस समाधानकारक रुग्णवाढीत पडत असलेली घट आणि कोरोनामुक्त होत असलेल्यांची वाढती संख्या बीड जिल्हावासीयांना दिलासा देत आहे. बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव प्रत्येक तालुक्यात,गावात आणि प्रत्येक भागामध्ये झाला असताना कोरोना रुग्णवाढीत दररोज घट पडत आहे. मात्र नागरिक आता निष्काळजी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये तोंडावर मास्क न लावता सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत नागरिक सर्रासपणे गर्दी करताना दिसत आहेत. कोरोना रुग्णवाढ घटली असली तरी अद्याप कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांना स्वयंशिस्तीचे पालन करत कोरोना विषाणूपासून खबरदारीने राहणे अत्यावश्यक आहे.

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यांमधून तब्बल 69 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती भेटली आहे. आजपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकूण 13 हजार 379 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर आजपर्यंत 417 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या बीड जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट 11 .03% एवढा आहे. आणि रिकव्हरी रेट 89.68% एवढा आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता खबरदारी घ्यावी. आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा.

पंकजाताईंना शिवसेनेकडून ऑफर उद्धव ठाकरेच देऊ शकतात

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट खालील प्रमाणे

lk.