भारत

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला निर्णय

29 Oct :- केंद्र सरकारच्या वतीने देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे. इथेनॉलच्या किमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये इथेनॉलची किंमत 43.75 रुपये प्रतिलिटर वरून 45.69 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इथेनॉलच्या किमतीत जवळपास 8 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची घोषणा केली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतण्यात आला. इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्यात आलेली आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना लाभ व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रक्रियेच्या आधारावर ती इथेनॉल तयार झालेले आहे. त्याच्या आधारावर ती किंमत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

वाचा :- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; दिवाळीनंतर ‘शाळा’ सुरू होणार!

2014 मध्ये 38 हजार लिटर इथेनॉल तयार होते होते. यावर्षी जवळपास 95 हजार लिटर इथेनॉल तयार झालेले आहे. यामुळे एक मोठा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. इथेनॉलचे जीएसटी आणि परिवहन खर्च कंपनी देत असते. हा निर्णय पर्यावरणासाठी पूरक असून यामुळे पेट्रोलची खपत कमी होते. पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होते. सोबतच ज्यूटच्या पोत्यांची सक्ती करण्यात आलेली आहे.

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

देशातील सर्व खाद्यान्नाची पॅकिंग तागच्या पोत्यात करावी लागणार आहे. तर 20 टक्के साखरसाठी उपयोगात आणली जाणार आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.देशातील सात राज्यांमध्ये 223 धरणांचे बांधकाम करण्याकरिता योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे धरणाचा देश आहे. देशात या घडीला 5334 धरण आहेत. या सगळ्या धरणाच्या देखरेखीवर दुर्लक्ष होत होते. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

वाचा:- संतापजनक! नवजात बाळाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

वाचा :- 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकाचा पर्दाफाश

वाचा :-  माझ्यावर बलात्कार झाला असता- अमिषा पटेल