भारत

अनलॉक -5 साठी गाईडलाईन्स जारी; जाणून घ्या नवे नियम

अनलॉक -5 जैसे थे!

27 Oct :- केंद्र सरकारने Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे सध्या जी काही बंधने आहेत तीच पुढच्या महिनाभर कायम राहणार आहेत. कोरोनाची साथ अजुन संपलेली नाही त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल असही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अनलॉकच्या प्रक्रियेनुसार जवळपास अनेक बंधन ही वगळण्यात आली असून काही बंधनेच कायम ठेवण्यात आली आहेत असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.नागरीकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही असंही सरकारने म्हटलं आहे.

शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती केल्यास मुख्याद्यापकांवर होणार कारवाई

अनलॉक करत असताना केंद्र सरकार मार्गदर्शक तत्व जाहीर करतं. त्यानुसार राज्य सरकार स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत असतं. काही राज्यांमध्ये मंदिरं खुली करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारने मंदिरं सुरू करण्याला अजुनही परवानगी दिलेली नाही.

तिरंग्याचा अवमान करत मुफ्तीने दिले केंद्राला पुन्हा आव्हान

प्रवास आणि इतर गोष्टींसाठी आता कुठलीही बंधन नाहीत. या अनलॉकच्या पुढच्या प्रक्रियेतही हे नियम असेल राहणार आहेत.अनलॉक -4 मध्ये, थिएटर, शाळा, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना अटीसह सूट देण्यात आली होती. स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत.

नवनीत राणा यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला