‘या’ ठिकाणी रुग्णवाढीमुळे ‘कर्फ्यू’ लागू होणार
प्रशासनाने उचलली कठोर पावलं
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इटलीमधील प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहे. इटलीत देशव्यापी लॉकडाऊन संपलल्यानंतर कोरोनाचं केंद्र राहिलेलं लोम्बार्डीत कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहेत. ज्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता लोम्बार्डीमध्ये उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता क्षेत्रीय प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. आता लोम्बार्डीमध्ये कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाचा :-लस दिल्यानंतर या कारणामुळे झाला 5 जणांचा मृत्यू
लोम्बार्डीमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू असेल. गुरुवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तब्बल तीन आठवडे हा कर्फ्यू राहणार आहे. हा कर्फ्यू 13 नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं सांगितलं जातं आहे. शिवाय आठवड्याच्या शेवटी शॉपिंग मॉलदेखील बंद राहणार आहेत.
वाचा :- आता पंकजाताई मुंडेंनी शिवसेनेत यावे
द गार्डनच्या वृत्तानुसार युनिव्हर्सिटी ऑफ मिलानमधील व्हायरोलॉजिस्ट फॅब्रिझायो यांनी सांगितलं, सोमवारी इटलीमध्ये 9,338 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 1,687 प्रकरणं फक्त लोम्बार्डीतील आहेत आणि हा खूप मोठा उद्रेक आहे. लोम्बार्डीची राजधानी आणि इकोनॉमिक हब असलेल्या मिलानमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे
लोम्बार्डीत सध्या 113 लोक आयसीयूमध्ये दाखल आहेत. जर वेळीच हालचाल केली नाही तर महिना अखेरपर्यंत ही संख्या जवळपास 600 वर पोहोचले, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लोम्बार्डीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो श्पेरन्जा यांनी क्षेत्रीय प्रशासनासह बैठक घेतल्यानंतर अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास परवानगी दिली आहे.