सावधान! ‘या’ भागामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता
हवामान खात्याचा इशारा; पुढचे 3-4 तास धोक्याचे
12 Oct :- गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. शनिवारीही अनेक ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस झाल्याने 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आजही राज्याच्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर पुढच्या काही तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाचं काम नसल्यास घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3-4 तास धोक्याचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनीही विनाकारण बाहेर पडू नये. दरम्यान, जालन्यात बऱ्याच तासापासून जोरदार पावसास सुरू आहे. शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
वाचा :- ‘महाराष्ट्रात डिसेंबर सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल’
परतूर शहरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तुर, कापसाचे मोठ्या प्रमाणआत नुकसान झालं आहे. काही भागात जोरदार पावसांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 16 जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करम्यासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे.
वाचा :- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला धक्कादायक इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशासह मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडुसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मॉन्सूनची चाहूल लागली असून आसाम, मेघालय परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
वाचा :- कोरोनाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला