बीड

सुखद! बीड जिल्ह्यात आज पुन्हा 134 रुग्ण कोरोनमुक्त!

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!

12 Oct :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बीड जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ आटोक्यात येत असून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे. कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

शरीरामध्ये सौम्य लक्षण आढळताच त्वरित नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्य आहे. मात्र नागरिक डॉक्टरांच्या परस्पर मनानेच मेडिकलवर जाऊन दैनंदिन गोळ्या-औषंधाची खरेदी करून कोरोना दुखणं अंगावर काढत आहेत. आज बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्यने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

वाचा :- बीड कोरोना ब्रेकिंग! आज 78 नवे रुग्ण पॉझिटिव्ह!!

आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 11629 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आजची बीड जिल्ह्यामधील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी आहे. आज बीड जिल्ह्यातून तब्बल 134 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे. आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 347 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 10.09% आहे. तर रिकव्हरी रेट 83.53 % एवढा आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!

वाचा :- बीड कोरोना ब्रेकिंग! आज 78 नवे रुग्ण पॉझिटिव्ह!!

वाचा :- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला धक्कादायक इशारा