असे काय केले? 4 दिवसातच ट्रम्प कोरोनामुक्त झाले!
व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प परतले!
6 Oct :- अवघ्या जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेची राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घेरले आहे.आणि विशेष म्हणजे केवळ चार दिवसतातच डोनाल्ड ट्रम्प कोरोनामुक्त झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. म्हणून जगभरात सर्वत्र प्रश्न पडला आहे. आखेर अमेरिकेने राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असे कोणते उपचार केले की अवघ्या चार दिवसांमध्येच ट्रम्प यांना कोरोनामुक्तीची पावती भेटली.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कोरोनाव्हायरसवरील उपचारांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी ते व्हाइट हाउसमध्ये परतले. त्यावेळी त्यांनी आपल्या नाकावरचा मास्क काढला आणि आपण कोरोनातून बरे झालो आहोत, असंच त्यांनी दाखवून दिलं. वॉल्टर रिड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमधून उपचार घेऊन ट्रम्प परतल्यामुळे जगभरातील आणि अमेरिकेतील अनेक शास्रज्ञांनीही त्यांच्यावर जबरदस्त टीका केली. त्यांच्यावर झालेल्या उपचारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
वाचा – काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!
ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरुवातीला ते व्हाइट हाउसमध्येच राहणार असल्याचं त्यांचे डॉ. सिएन कॉन्ले यांनी सांगितलं होतं. पण नंतर त्यांना वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ट्रम्प यांना झिंक, व्हिटॅमिन डी, अँटॅसिड आणि अॅस्प्रिन ही औषधं देण्यात आली असं असोसिएट प्रेसनं सांगितलं. ट्रम्प त्यांना रेमडेसिवीर, डेक्सामेथासोन, फॅमोटिडाइन तसंच ऑक्सिजन थेरेपी देण्यात आली असंही असोसिएटेड प्रेसच्या बातमीत म्हटलं आहे.
वाचा – ‘या’ तारखेला होणार MPSC परीक्षा
रिजनेरॉन औषधाचं सध्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या औषधातील दोन मोनोक्लोनल अँटिबॉडी कोरोनाच्या विषाणूला निष्क्रिय करतात असा औषध तयार करणाऱ्या कंपनीचा दावा आहे. ट्रम्प यांना REGN-COV2 चा सिंगल डोस देण्यात आला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. डेक्सामेथासोन हे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे आणि त्यावर ब्रिटनमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. कोव्हिडमुळे गंभीर आजारी म्हणजे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जातं. हे औषध ट्रम्पना दिल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती, हे सिद्ध होतं.
वाचा – मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी सुरु होणार सिनेमागृह
कोरोनाव्हायरसवरील उपचारासाठी वापरलं जाणारं हे अँटिव्हायरल औषध आहे. ट्रम्प यांच्यावरील पाच दिवसांच्या उपचारांदरम्यान हे औषध वापरलं जाईल असं त्याच्या वैद्यकीय टीमने आधी सांगितलं होतं. रेमडेसिवीरमुळे रुग्णांच्या तब्येतीत प्लासिबो औषधांच्या तुलनेत खूप गतीने सुधारणा होतं असं क्लिनिकल ट्रायलमध्ये सिद्ध झालं आहे.