शास्त्रज्ञांचा दावा;कोरोनावर सापडला प्रभावी उपचार!
रुग्णालयात दाखल न होताच होणार कोरोना रुग्णांवर उपचार!
27 Sept :- जगभरात कोरोना विषाणूचे माहाकाय थैमान सुरु आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी दिवसेंदिवस जगवरील संकट मोठ्या प्रमाणात गडद करत आहे.जगभरात कोरोना विषाणूवर मात करणारी प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.अनेक अक्कल-युक्त लढवून कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ,आरोग्य विभाग आहोरात्र मेहनत करतो आहे.मात्र कोरोना विषाणूचा वेगाने वाढणारा पसरावं आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. अशा भयाण परिस्थितीमध्ये सर्वांच्या मनाला दिलासा देणारी आनंदाची माहिती समोर आली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
सध्या कोरोनाव्हायरसवर कोणताही प्रभावी उपचार नाही. उपलब्ध असलेल्या इतर आजारांवरील औषधं दिली जात आहेत, शिवाय लशीसाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. अशात आता अमेरिकेतच्या शास्त्रज्ञांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.फ्लोरिडामधील एडवेंटहेल्थ रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी एक थेरेपी तयार केली आहे.
वाचा :- जागतिक आरोग्य संघटनेने दिला ‘हा’ गंभीर इशारा
कोरोनाव्हायरसवर ही थेरेपी 100 टक्के प्रभावी ठरेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.ICAM असं या थेरेपीचं नाव आहे. चार प्रकारचे औषध एकत्र करून एक थेरेपी तयार केली आहे. fox35orlando.com रिपोर्टचा हवाला घेत हे वृत्त समोर आलं आहे.हे नवं औषध नाही तर आधीपासून वापरात असलेल्या चार औषधांची एक थेरेपी तयार करण्यात आली आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंकसारखे इम्युनोसपोर्ट औषधं, कोर्टिकोस्टेरॉईड्स,अँटिकोगलंट्स आणि मॅक्रोलाइड्स यांचा समावेश आहे.
वाचा :- कोरोना विरुद्ध लढणाऱ्या एँटीबॉडीचा लागला शोध
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने ही थेरेपी तयार करण्यात आली आहे. हे औषध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवण्यासह फुफ्फुसाला येणाऱ्या सूजेपासूनही संरक्षण करेल.सध्या याचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ट्रायलदरम्यान जर ICAM थेरेपी सुरक्षित आणि प्रभावी ठरली तर रुग्णालयात दाखल न करतादेखील कोरोना रुग्णांवर उपचार करता येतील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
वाचा :- ‘या’ कारणामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती;मुख्यमंत्र्यांचा इशारा
वाचा :- 3 तासांच्या चौकशीनंतर दीपिकाने दिली धक्कादायक कबुली!