वाढत्या कोरोनाच्या प्रसारात ‘या’ लक्षणांकडे गांभीर्यानं लक्ष द्या!
सध्यातरी कोरोनावर ‘खबरदारी’ हा एकमेव उपाय!
23 Sept :- देशात कोरोनाचे महाकाय थैमान थांबण्याचे काही नाव घेत नाही.कोरोना विषाणूंवर मात करणाऱ्या अनेक प्रभावी लशींवर युद्ध पातळीवर काम सुरु आहे.कोरोना विषाणूचा वेगाने वाढणारा संसर्ग जीवावर बेतण्या आगोदर योग्य ती खबरदार घेतली तर कोरोना विषाणूच्या चपेटीतुन स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करता येणे शक्य आहे हे नक्की. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५६ लाखांच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारात कोणत्या लक्षणांकडे गांभीर्यानं पाहायला हवं..?
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
तुम्हाला सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास सामान्य फ्लू असू शकतो. पण सतत दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि तीव्रतेने खोकला येत असेल तर कोरोनाचं लक्षणं असू शकतं. साधारणपणे ऑक्सिजनची कमतरता भासल्यास असा त्रास होतो.”अजूनही या व्हायरसला समजून घेणं कठीण आहे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि लक्षणं दिसत नसतील तर तो व्यक्ती बरा होऊ शकतो.तर अनेकदा पॉजिटिव्ह असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते.
वाचा :- शाळा प्रवेशासाठी शासनाने जाहीर केला ‘हा’ निर्णय
घरी आयसोलेशनवर असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास कधीही मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. म्हणून रुग्णालयात लगेचच भरती केलं जातं.जेव्हा कोरोनाची लक्षणं असून चाचणी पॉझिटिव्ह आलेली असते. ज्यांना श्वासासंबंधी आजार असतो त्यांनी ऑक्सीमीटरचा वापर करायला हरकत नाही. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर तुलनेनं चांगला आहे. यामागेही एक कारण आहे. भारतातील लोकसंख्येत तरूणांचे जास्त आहे.
वाचा :- वैज्ञानिकांचा खुलासा; कोरोना लसी बाबद दिली ‘ही’ माहिती!
”आपल्या देशात सुशिक्षित लोकही टेस्ट करून घेण्यासाठी अनेकदा विचार करत आहेत. पॉझिटिव्ह आल्यास घराला होम आयसोलेशनचा स्टिकर लावला जाईल अशी भीती त्यांना वाटते. पण वेळेवर चाचणी न केल्यास कोरोना संक्रमण महागात पडू शकतं हे समजून घ्यायला हवं. वेळेवर उपचार घेतल्यास या आजारापासून स्वतःला वाचवता येऊ शकतं.कोरोना विषाणू नेहमी नाक, डोळे, घसा या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. जे लोक मास्क वापरतात त्यांनीही अधिक काळजी घ्यायला हवी. मास्क वापरत असताना नेहमी नाकाच्या खाली किंवा अनेकदा गळ्याजवळ असतो. संसर्गापासून बचाव करण्यासाठी या गोष्टी टाळायला हव्यात. ”