News

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अन्यथा मनसे राज्यभर आंदोलन करणार’

पंढरपूर, 21 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. कोर्टातून आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. अशात मनसेने लोकल सुरू करण्याच्या मागणीनंतर मराठा समाज्याचा बाजूने आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनसे मैदानात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रेंनी दिला आहे. सोलापूर जिल्हा बंद आंदोलनात मनसे सक्रिय सहभाग घेतला आहे. पण जर आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर मनसे आक्रमक आंदोलन करणार असा इशारा मनसेकडून करण्यात आला आहे.