महाराष्ट्रGang RapeNewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतमराठवाडा

परभणी जिल्यात नाबालिक मुलीवर सामूहिक बलात्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२० सप्टेंबर | परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर ३ जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.सोनपेठ तालुक्यातील १६ वर्षीय मुलीला त्याच परिसरातील तीन मुले मागील दोन वर्षांपासून त्रास देत होती. त्यातच १२ सप्टेंबर रोजी या नराधम तरुणांनी पीडित मुलीला तालुक्यातील डिघोळ तांडा परिसरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र पीडित मुलीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी १९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी भादंवी कलम ३७६(ड),३५४(ड)३४ सह कलम ३,६,८,१७ सह पोस्कोअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यातही घेतलं आहे. या बलात्कार प्रकरणातील अन्य एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेचा अधिक तपास सोनपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी, पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांच्यासह सोनपेठ पोलीस करत आहेत.दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि नंतर झालेल्या मुलीच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.