देश विदेश

‘या’ देशात पुन्हा लॉकडाऊन

14 Sept :- जगभरात कोरोना व्हायरसचे संकट अधिक गडद होत चालले आहे. दररोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. काही देशांमध्ये कोरोना संख्या कमी झाली, मात्र पुन्हा आता नवे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे पुर्वपदावर आलेले जनजीवन पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने इस्त्रायलने दुसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करणारा इस्त्रायल हा पहिलाच देश आहे. येथे लोकांना घरापासून 500 मीटर पेक्षा अधिक लांब जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

इस्त्रायलमध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. काल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याबाबतची घोषणा केली.नेतन्याहू म्हणाले की, मला माहिती आहे या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल. आपण नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करू शकतो. वेगाने टेस्टिंग देखील सुरू आहे व लस देखील लवकरच येणार आहे.

वाचा :- धक्कादायक! 2024 पर्यंत तयार होणार कोरोना लस

लॉकडाऊनमध्ये सर्व हॉटेल-पब, दुकाने आणि रिक्रएशनल सुविधा बंद राहतील. शाळा देखील या काळात बंद असतील. दरम्यान, इस्त्रायलची लोकसंख्या जवळपास 88 लाख आहे. येथे आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा :- आठवडाभरात ‘हा’ मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो