बीड

गुरुवारी पुन्हा कोरोनाचे जिल्ह्यात शतक

बीड,दि.10(प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात कोरोनाने सलग चार दिवस शतक साजरे केले आहे. गुरुवारी पुन्हा एकदा जिल्ह्यात 110 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह अंबाजोगाईत 24 रुग्ण आढळले आहेत.


बीड जिल्ह्यातील कोरोनाने नवनवीन रुग्ण गाठण्याचे लक्ष्य कायम ठेवलेले दिसून येत आहे. गुरुवार दि.10 सप्टेंबर रोजी तब्बल 750 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 640 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 110 कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात अंबाजोगाईत तालूक्यात सर्वाधिक 24, बीड तालूक्यात 20, आष्टीत 2, परळीत 18,धारुर तालूक्यात 9, गेवराई तालूक्यात 6, केज तालूक्यात 3 माजलगावात 14 ,पाटोद्यात4,शिरुर कासार तालूक्यात 5, वडवणीत 5 असे एकूण 110 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.