राजकारण

इम्तियाज जलील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

2 Sept :- खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाझ अदा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच कारवाई करत खासदार जलील यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे शहागंज मशिद परसरात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मशीद परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.मंदिर-मशिद प्रवेश करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच खबरदारी म्हणून खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.MIM खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं की, आमचं आंदोलन हे प्रतिकात्मक होतं.

हे वाचा :- आनंदाची बातमी! ऑक्सफर्ड कोरोना लस ‘या’ आठवड्यात होणार तयार

आम्ही मशिदीत हजारोंच्या संख्येने जाणार नव्हतो.मोजक्याच लोकांना घेऊन आम्ही मशिद उघडून नमाझ अदा करणार होतो. मात्र, त्यासाठीच पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि ताब्यात घेतलं. मात्र, राज्य शासनानं धार्मिकस्थळं लवकरात लवकर उघडावीत, अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे. तसेच शहागंजमधील मशिद परिसरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन देखील खासदार जलील यांना केलं आहे.

हे वाचा :- नागरीकांनो, lPG घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाणून घ्या!

दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा दिला होता. खासदार जलील मंदिरात प्रवेश करणार होते. तितक्यात MIM मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला शिवसेनेनं कडाडून विरोध केला. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, खासदार जलील हे मशिद उघडून नमाझ अदा करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

हे वाचा :- तापसीला आला रियाचा पुळका,म्हणाली…