शाळा,कॉलेज सुरू करणं पडलं महागात!
4 हजार विद्यार्थी तर 600 शिक्षक क्वारंटाइन!
26 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण अवघ्या जगभराची डोकेदुखी ठरली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावामुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.यामुळे जगभरातील संपूर्ण मानव जातीचे दैनंदिन जीवन विस्कळीत आणि उध्वस्त होऊन बसले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
जगभरात कोरोनामुळे अनेक क्षेत्रावर परिणाम झालेला दिसून येत आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणखीनही शाळा,कॉलेजस सुरु केलेले नाहीत.मात्र अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धाडस करत मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता शाळा आणि कॉलेजस सुरु केलेत मात्र. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा निर्णय सपशेल अपयशी ठरला आहे.
हे वाचा :- कोरोना रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना शाळा -कॉलेज सुरू करणं चांगलंच महागात पडलं आहे.शाळा-कॉलेज सुरू होताच अमेरिकेच्या 24 राज्यांतील कॉलेजमध्ये कोरोनाची प्रकरणं आढळून आली आहे.शाळा-कॉलेज सुरू होताच अमेरिकेच्या 24 राज्यांतील कॉलेजमध्ये कोरोनाची प्रकरणं आढळून आली आहे.फक्त मिसीसिपी राज्यातच जवळपास 4 हजार विद्यार्थी आणि 600 शिक्षकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे
हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!
.राज्याचे आरोग्य अधिकारी डॉ. थॉमस ई डॉब्स यांनी सांगितलं, 31 शाळांमध्ये संक्रमणाची प्रकरणं दिसून आली आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.अलबामा युनिव्हर्सिटी सुरू झाल्यानंतर एक आठवड्यात कोविड-19 चे 566 रुग्ण आढळून आले.मार्चपासून सुट्ट्यानंतर गेल्या आठवड्यापासूनच 20,000 पेक्षा अधिक विद्यार्थी युनिव्हर्सिटीला येऊ लागले होते.
हे वाचा :- हिवाळ्यात कोरोना होणार आणखी गंभीर; जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा विश्वास