भारत

Unlock-4; ‘हे’ नवे नियम जाहीर होण्याची शक्यता

25 Aug :- Unlock 3 संपयला आता काही दिवसच राहिले असून Unlock 4.0ची प्रक्रिया सुरु झाली आहे. 30 ऑगस्टपर्यंत या अनलॉकची मुदत असून महिन्याच्या शेवटी नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. या अनलॉक 4.0मध्ये शाळा आणि कॉलेजेस बंदच राहणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या टप्प्यात मेट्रो सेवेला मंजूरी मिळू शकते अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. गृहमंत्रालय याबाबतील लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारे निर्णय घेत असतात.प्रवासी आणि माल वाहतुकीवरची बंधन उठवा असा सल्ला केंद्राने सर्वच राज्य सरकारांना नुकताच दिला होता.

हे वाचा :- भारतात हल्ले घडवून आणण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र उघडकीस!

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी केंद्र सरकारने आता सर्व व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.देशात सध्या Unlock 3 सुरु आहे. त्यासाठीची मार्गदर्शक तत्वेही केंद्राने जारी केली होती. मात्र या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारल्या मिळाल्या आहेत.

हे वाचा :- भारताविरोधात माजोड्या चीनने उचललं ‘हे’ पाऊल

त्यामुळे केंद्राने सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून फटकारलं असून प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठविण्याचे निर्देश दिले आहेत.केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्यांना पत्र पाठवली आहेत. त्यात त्यांनी हे सर्व निर्बंध हटविण्याची मागणी केलीय. या निर्बंधांमुळे मालाच्या पुरवढ्यावर प्रतिकूल परिणाम झाले आहे. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहांवर झाला आहे. त्यामुळे हे निर्बंध हटविण्यात यावेत असंही त्यात म्हटलं आहे.

हे वाचा :- …आणि कोरोना रुग्णालयातच सुरु केली दारू पार्टी!