देश विदेश

धक्कादायक; हुकुमशाह किम जोंग उन कोमामध्ये!

25 Aug :- उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन कोमामध्ये असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची बहिण किम यो जोंग या राष्ट्राची धुरा हाती घेणार आहे. काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त होते.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

परंतु त्यानंतर एका प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांसमोर येऊन त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.किम जोंग उन हे सध्या कोमाममध्ये आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत देशाची धुरा त्यांची बहिण किम यो जोंग सांभाळत आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी दिली.

हे वाचा :- Unlock 4 बाबद मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत!

मिन यांनी यापूर्वी दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम देई जुंग यांच्यासोबत त्यांचे विशेष सहाय्यक म्हणूनही काम केले आहे.सत्ता सांभाळण्याची किम यो जोंग यांची पहिलीच वेळ नाही.यापूर्वीही त्यांनी किम जोंग उन यांच्यासोबत काम केले आहे आतापर्यंत किम यो जोंग यांच्या हाती संपूर्ण सत्ता सोपवण्यात आली नाही.

हे वाचा :- भारतात हल्ले घडवून आणण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र उघडकीस!

नेतृत्वाचे संकट अधिक काळासाठी सुरू राहू नये आणि सरकार चालवण्यातील अनेक गोष्टी त्यांना समजाव्या म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असंही मिन यांनी सांगितले आहे.

हे वाचा :- …आणि कोरोना रुग्णालयातच सुरु केली दारू पार्टी!