भारत

…यामुळे माहीने घेतली ०७:२९ मिनिटांनी निवृत्ती!

20 Aug :- कॅप्टन कूल,माही,ग्रेट फिनिशर अशा कैक नावांनी जगभरात लोकप्रिय असणारा आणि भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनलेला रांगड्या शैलीचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला जेव्हा देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत होता, त्याच दिवशी क्रिकेटलाकायमस्वरूपी अलविदा केला.

दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा

एम एस धोनी ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पर एक व्हिडिओ पोस्‍ट केला आणि यासोबत लिहले की, “नेहमी आपल्या प्रेम आणि सोबतीसाठी आभारी आहे.१९:२९ तासाने मला सेवानिवृत्‍त समजा !” या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित धक्का दिला, तसेच या बातमीने अनेक लोक विचारात पडले की भारतीय वेळेनुसार ठीक संध्याकाळी सात वाजून २९ मिनिटांनी संन्यास घेण्याचे नेमके काय कारण आहे ?काय धोनीचे यावेळेस संन्यास घेण्यामागे काही विशेष असं कारण होते ? का कोणता मुहूर्त? की अजून काही ? जेव्हा आम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे निदर्शनास आले की, भारतीय संघ गेल्या वर्षी ९ जुलै रोजी विश्वकप मधून ठीक याच वेळी बाहेर पडला होता.

(हे वाचा:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहले महेंद्रसिंग धोनीला पत्र, म्हणाले…)

एमएस धोनी हा शेवट या दिवशी क्रिकेट मैदानावरून फलंदाजी करून परतला होता. मार्टिन गप्टिल ने एमएस धोनीला बाद करून अनेक भारतीय चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. बाद झाल्यामुळे भारतीय संघाची हार निश्चित झाली होती. जेव्हा युजवेंद्र चहल शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला होता, तेव्हा भारतीय संघ आपल्या देशाच्या नुसार ठीक संध्याकाळी ०७.२९ ने विश्व कप सामना मधून बाहेर पडली होती. चहलच्या बाद होण्यानंतर काही क्षणांतच न्युझीलंडचे माजी ऑलराउंडर ग्रांट एलियट ने ट्वीट केले होते.तसे तर एमएस धोनी ची संन्यास घेण्याबाबतची पोस्ट खूपच र ह स्य म य आहे. धोनी ने लिहले की, १९२९ तासाने मला संन्यास घेतलेला क्रिकेटर समजा. जर १९२९ तासाला जर दिवसात मोजले गेल्यास ते ८० दिवस होतात.


सचिन 2 लाख रुपयांना असणाऱ्या ‘त्या’ गाडीच्या प्रेमात!

या वर्षी आईपीएल ५३ दिवसाचा सामना रंगणार आहे. एमएस धोनीने याची ट्रेनिंग १५ ऑगस्ट पासून केली. आईपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबर ला होईल. जर या पोस्टबाबत विचार केला गेला तर ८० दिवसानंतर धोनीला माजी खेळाडू च्या रूपात ओळखले जाईल. असे वाटत आहे की, धोनी आपले शेवटचे आयपीएल खेळत आहे.

हे वाचा:- धक्कादायक! आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे निधन

पराभवाच्या कचाट्यात अडकलेल्या भारतीय संघास आडवे-तिडवे षटकार,चौकार, फटकार मारून, शक्य-अशक्य धाव काढून आणि शेवटी षटकार मारूनच विजयश्रीचा अनेकदा खिताब देणारा माही क्रिकेटमधून निवृत्त होईल हि कल्पना देखील कधी क्रिकेट प्रेमींना करावा वाटत नव्हती.क्रिकेटमध्ये प्रत्येक कृती करण्यामागे काहीतरी अर्थपूर्ण कारण असायचे.माहीने निवृत्त होत असतानाही अशाच एका अर्थपूर्ण कारणाने क्रिकेटला अलविदा करेल अशी कधी कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती.माहीच्या रांगड्यापणाला निश्चितच इथून पुढे क्रिकेट मुकणार आहे.