‘या’ महिन्यात होणार १० वी,१२ वी CBSE च्या पुरवणी परीक्षा!
13 Aug :- सध्य परिस्थितीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशभरात सर्वत्रच शाळा आणि कॉलेजस ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मुलांच्या परीक्षा कधी आणि कशा होणार हा प्रश्न प्रत्येक विध्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात आहे. CBSE च्या 10 आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांबाबात बोर्डाने माहिती दिली आहे. या परीक्षा या सप्टेंबर महिन्यात होणार असून त्यांच्या तारखांची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहून आढावा घेण्यात येईल आणि नंतरच तारखा घोषीत केल्या जातील असं सांगितलं जात आहे.
विद्यार्थ्यांच्या तयारीच्या दृष्टीने ही माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना आता तारखांची उत्सुकता असून बोर्ड केव्हा नेमक्या तारखा जाहीर करतो याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे.या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती.